भाविकातून चर्चेचा सूर, प्राधिकरणाची स्थापना ५० कोटी रु.ची तरतूद
वारणानगर / दिलीप पाटील
महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यातील लाखो भाविकांचे लोकदैवत आणि कुलदैवत असलेल्या वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील श्री जोतिबा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणाची स्थापना केली आहे. सुंदर जोतिबा योजनेमुळे या क्षेत्राच्या विकासाचा पाया घातला आता प्राधिकरणामुळे विकासाचा कळस व्हावा अशी अशी भावना लाखो भाविकांच्या चर्चेतून सूर उमटू लागला आहे.
महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सन २०२३-२४ मध्ये मतदार संघाचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या प्रस्तावास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र ज्योतिबा ता. पन्हाळा परिसर संवर्धन प्राधिकरणाची स्थापना आणि प्राधिकरण संदर्भातील नियोजन व आराखडा तयार करण्यासाठी तसेच प्राधिकरणाला चालना देण्याच्या सुरवातीच्या कामांसाठी प्राथमिक स्वरुपात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली श्री जोतिबा देव व तीर्थक्षेत्राचे व्यवस्थापन चालते. नवीन प्राधिकरण याच देवस्थान समितीच्या मार्फत होणार किंवा स्वतंत्रपणे या प्राधिकरणाचे काम चालणार याबाबत अद्याप कोणतेही दिशा निर्देश अथवा आदेश प्राप्त झालेले नाहीत अशी माहिती पाश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यानी सांगीतले.
श्रीक्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणाची स्थापना झालेवर यामध्ये परिसराचे क्षेत्र किती असावे यातील डोंगर पायथ्यांच्या गावांचा समावेश होणार काय ? तसेच कोल्हापूर – २त्नागिरी राज्य मार्गावरून श्री जोतिबाला जोडणाऱ्या शिवाजीपूल – वडणगे,कुशीरे, पोहाळे मार्ग, केर्ली – जोतिबा मार्ग (पोट मार्ग गायमुख), वाघबीळ, दानेवाडी – जोतिबा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग कासारवाडी ते जोतिबा मार्ग, गिरोली फाटा ते दानेवाडी रस्त्याला जोडणारा मार्ग, वाठार – कोडोली राज्य मार्गावरून अमृतनगर फाटा, बहिरेवाडी,जाखले, गिरोली मार्ग, कोडोली, पोखले, केखले,गिरोली रोडला जोडणारा मार्ग, कोडोली, म. माले,दानेवाडी रोडला जोडणारा मार्ग असे श्री जोतिबा क्षेत्राला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांचे संदीकरण डांबरीकरण आधुनिक तंत्रज्ञानाने होणे गरजेचे आहे.
जोतिबा डोंगर घाटात सर्वच बाजूनी संरक्षक भिंत, स्ट्रील ग्रील, आवशक ठिकाणी निवारा शेड, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह, सर्व सोयीनीयुक्त बसस्थानक, ठिकठिकाणी महापसादाच्या व्यवस्थेसाठी प्रसादालयाच्या सोयी, शासकीय विश्राम गृहाची क्षमता वाढवणे तसेच तिथे सर्व व्यवस्था निर्माण करणे यात्री निवास वाढवणे आशा पायाभूत सुविधा निर्माण होण्याची गरज आहे.
प्राथमिक स्थरावर शासनाने लोकसहभागातून पाच कोटी रु. चा सुंदर जोतिबा प्रकल्पातील अनेक कामे प्रलंबीत आहेत त्या कामाचा या प्राधिकरणात समावेश होणे गरजेचे आहे. यमाई मंदीर ते केखले डोंगर पायथ्यातील गणेश मंदीरा पर्यन्त दगडी पायरी मार्ग, दक्षिण दरवाजा ते कुशिरे दगडी पायरी मार्ग होणे गरजेचे आहे. तिरूपतीच्या धर्तीवर विकास व दर्शन व्यवस्था भाविकांना प्रसादाची सोय, मंदीर आवारातील ओवऱ्यामध्ये १२ ज्योतिर्लिंगाची स्थापना, दगडी कमानी डागडुजी, मंदीराची व आवाराचीदुरुस्ती,आवारातील फरसी, सांडपाणी व्यवस्थापन, ठिक ठिकाणी शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन पुजाऱ्यांना सेवा सुविधा यासह अनेक व्यवस्था होणे बरोबरच डोंगरावरील सर्वच मागीचे रूंदीकरण करणे, अतिक्रमण काढणे यासाठी विशेष तरतूद प्राधिकरणात होणे गरजेचे आहे.
जोतिबावर पोलीस चौकी आहे परंतु याला कायम स्वरूपी अधिकारी कर्मचारी नाहीत, दर्शन रांगा, लाखो भाविकाची चैत्र यात्रा, रविवार व पौर्णिमा यात्रेस येणारे भाविक यासाठी पोलीस बंदोबस्तासाठी उपाय योजना करणे सर्वच मार्गावर व प्रमुख ठिकाणी सिसीटीव्ही बसवणे, भव्य पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.
सुंदर जोतिबा योजना विकासाचा पाया….
राज्याच्या पुणे विभागाचे तत्कालीन आयुक्त अरूण बोगीरवार यांच्या अध्यक्षते खाली सुंदर जोतिबा योजनेची स्थापना झाली कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे तत्कालीन प्रांताधिकारी गौतम, पन्हाळ्याचे तत्कालीन तहसिलदार अजित पवार यानी जीवाचेराण करून सुंदर जोतिबा योजना साकारली ही योजना पाच कोटी रू.ची असलीतरी या अधिकाऱ्यानी पायरीला, झांडाना भक्तांचे नाव, वाडवडिलांच्या स्मरणार्थ पायरीला तसेच ज्या कामासाठी निधी दिला आहे त्या ठिकाणी देणगी दाराचे नांव लावण्याच्या अटीवर मोठ्या प्रमाणात देणगी स्वरूपात निधी जमवला पायरी मार्गसह इतर ठिकाणचे अतिक्रमन काढून कामाला सुरवात झाली, जोतिबा ते यमाई पायरीमार्ग, व्यापार संकुल, गार्डन, विश्रामगृह, वृक्षारोपन यासह अनेक सुविधा निर्माण झाल्या या पायाभूत सुविधामुळे भाविकात समाधान पसरले यातील काही कामे निधी अभावी अपूर्ण राहीली तरीही जोतिबा क्षेत्राच्या विकासाचा पाया सुंदर जोतिबा योजनेने घातला आहे.