उंब्रज/प्रतिनिधी
Karad News: तळबीड ता. कराड येथे महामार्ग लगत सुरू असलेल्या वृक्षतोडी दरम्यान वृक्षांचे पुन:रूपण करण्यासाठी थांबलेल्या अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान, यातून अभिनेते सयाजी शिंदे बचावले असून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. तळबीड येथून तुटणारी काही झाडे वाचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून वाचण्यासारखी झाडे वहागाव येथे प्लॅान्ट करण्यात येणार आहेत, असे यावेळी त्यांनी सांगितले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी महामार्गावरून अभिनेते सयाजी शिंदे प्रवास करत होते. दरम्यान वहागाव तळबीळ गावच्या हद्दीत सध्या महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. आज सकाळी झाडे तोडण्याचे काम सुरू असताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी घटनास्थळी थांबून परिस्थितीची पाहणी केली. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही झाडे प्लांटेशन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, यावेळी पाहणी करताना शेजारी असणाऱ्या वटवृक्षावरील मधमाशांनी हल्ला केल्याने एकच भंबेरी उडाली. यावेळी घटनास्थळी असणारे सयाजी शिंदे यातून बचावले मात्र, मधमाशा शांत झाल्यानंतर सयाजी शिंदे यांनी पुन्हा झाडांच्या प्लांटेशनसाठी पुढाकार घेतला आहे. तळबीड, बेवलडे येथील झाडे सुस्थितीत काढून ते वहागावच्या हद्दीत पुन्हा प्लॅन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









