परदेशी भूमीवर जाऊन भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून भगवान बसवेश्वरांच्या विचारांवर हल्ला करणाऱ्यांपासून कर्नाटकातील लोकांनी दूर राहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदीं (PM Narendra Modi) यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी (Rahul Gandhi) याच्यावर अप्रत्यक्ष टिका केली. आपल्या जाहीर सभेत त्यांनी कॉंग्रेसवर टिका करताना त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnatak constitution Asembly) रणशिंग फुंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी बेंगळूर- म्हैसूर एक्सप्रेसवेचे लोकार्पण केले. तसेच कर्नाटकातील हुबळी- धारवाडमध्ये प्रकल्पाची पायाभरणी कार्यक्रमात जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “काही लोक परदेशी संत बसवेश्वर यांचा ज्या ठिकाणी पुतळा आहे तिथे जाऊन देशाची बदनामी करत आहेत. त्यांनी तिथे जाऊन भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्णाण केले आहे. हा भारताचा आणि बसवेश्वरांचा अपमान आहे. अशा परदेशी भुमीवरून लोकशाहीवर टिका करणाऱ्यांपासून कर्नाटकातील लोकांनी दुर राहीले पाहीजे” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आज मी भगवान बसवेश्वरांच्या भूमीवर आहे, मी स्वताला भाग्यवान समजतो. अनुभव मंटपाची स्थापना हे त्यांच्या अनेक उल्लेखनीय योगदानांपैकी एक आहे. संपूर्ण जग या लोकशाही व्यवस्थेचा अभ्यास करते. भारत ही केवळ सर्वात मोठी लोकशाहीच नाही तर लोकशाहीची जननी आहे. भगवान बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी लंडनला आमंत्रित करण्यात आल्याचे मला भाग्य लाभले.” असेही ते म्हणाले.