बांदा / प्रतिनिधी
At Satose, Vasudha Dhuri became the standard of the game Paithani..!
महिला दिनानिमित्त सातोसे ग्रामपंचायत व महिला ग्रुप सातोसे यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त घेण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या स्पर्धेत वसुधा वसंत धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकावत त्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर सौ .कावेरी पेडणेकर द्वितीय, सौ शुभदा गवंडी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. एन .डी. कार्वेकर यांनी केले यावेळी माऊली महिला मंडळाचा बहारदार फुगड्यांचाही कार्यक्रम झाला. यावेळी आयोजित केलेल्या रांगोळी, संगीत- खुर्ची, वेशभूषा स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे परीक्षण बाळकृष्ण बर्डे व गवस यांनी केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सातोसे सरपंच सौ.प्रतिक्षा मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात तर उद्घाटन मनीषा सातार्डेकर यांनी केले.यावेळी उपसरपंच रुपेश साळगावकर, माजी सरपंच मदन सातोस्कर ,देवस्थान समिती अध्यक्ष वसंत धुरी ,प्रसाद मांजरेकर ,ग्रामपंचायत सदस्य शुभदा गवंडी, अपर्णा पेडणकर, सौ धुरी ,सौ भगत, तनुजा गडेकर ,आदी उपस्थित होत्या .या कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या प्रा सौ सुषमा प्रवीण मांजरेकर यांचा सरपंच सौ मांजरेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला ,तसेच सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी सौ वैशाली मेस्त्री यांचाही सत्कार करण्यात आला.









