प्रतिनिधी/ पणजी
न्यायाधीशांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून 40 लाख ऊपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी एका वकिलाला अटक केली आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून वाळपई पोलीस त्याबाबत सखोल तपास करीत आहेत.
अटक केलेल्या संशयिताचे नाव मुजाहिद्दीन शेख असे आहे. संशयित शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावे अनेक गुन्हे नोंद आहेत. काही महिन्यापूर्वीच त्याला पणजी आल्तिनो येथील न्यायालयात चोरी केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. या प्रकरणात अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नसले तरी तपास सुऊ असतानाच त्याला वाळपई पोलिसांनी दुसऱ्या प्रकरणात अटक केली आहे. वाळपई पोलीस पुढील तपास करीत आहेत.









