पोलीस आयुक्तांचा आदेश
► प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर-वडगाव परिसरात रविवार दि. 12 मार्च रोजी होणाऱ्या रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व उपनगरांत रविवारी दारूविक्री बंदीचा आदेश बजावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी हा आदेश काढला आहे.
रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी खबरदारी म्हणून रविवारी सकाळी 6 ते मध्यरात्री 12 पर्यंत वॉईन शॉप, बार, दारू दुकाने, केएसबीसीएल डेपो, क्लबमध्ये दारूविक्री बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान शहापूर-वडगाव व ग्रामीण भागातील रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने व्यापक बंदोबस्त ठेवला आहे. रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.