टेक महिंद्राचे एमडी-सीईओ होणार
बेंगळूर / वृत्तसंस्था
इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. मोहित आता टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्विकारणार आहेत. मात्र, ते जूनपर्यंत इन्फोसिसमध्ये कार्यरत राहणार आहेत. मोहित जोशी गेल्या 22 वर्षांपासून इन्फोसिसमध्ये काम करत होते. ते सध्या इन्फोसिसमध्ये जागतिक वित्तीय, आरोग्य सेवा आणि सॉफ्टवेअर व्यवसायांचे प्रमुख होते. आयटी कंपनीत दीर्घकाळ राहिल्यानंतर जोशी आता टेक महिंद्रामध्ये आपली पुढील कारकीर्द घडवणार आहेत. सी. पी. गुरनानी 19 डिसेंबर 2023 रोजी निवृत्त झाल्यानंतर मोहित जोशी हे एमडी आणि सीईओ म्हणून काम पाहतील. मात्र, तत्पूर्वीच ते टेक महिंद्रा कंपनीत दाखल होऊन कंपनीच्या सर्व व्यवहारांची माहिती जाणून घेणार असल्याचे टेक महिंद्राने एका निवेदनात म्हटले आहे.









