Hasan Mushrif ED Raid In Kagal : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी ईडीने पुन्हा छापा टाकला. मुश्रीफांच्या घरावर छापा टाकल्यानंतर कागलमध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजप आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्याने स्वत:चे डोके आपटून घेतले. रक्तबंबाळ झालेल्या कार्यकर्त्याला पोलीसांनी रूग्णालयात दाखल करण्य़ाचा प्रयत्न केला मात्र रुग्णालयात न जाता कार्यकर्ता मुश्रीफांच्या घरोसमोर आंदोलनात सहभागी होवून घोषणाबाजी करत राहिला . तर दुसरीकडे मुश्रीफांच्या पत्नींना अश्रु अनावर झाले. या सगळ्या घटनेला कॅमेरात कैद केलयं आमचे सोशल मिडियाचे व्हिडिओ ग्राफर सुरज पाटील यांनी. ईडीने छापा टाकल्यानंतर कागलमध्ये वातावरण तापलयं. त्याठिकाणी नेमकं काय घडलय हे जाणून घेऊया या फोटोच्या माध्यमातून…
















