- महाराष्ट्रातील धार्मिक क्षेत्रांचा विकासासाठी भरघोस निधी खर्च करण्यात येणार असून अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
- फुलेवाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होणार आहे. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेमध्ये नव्याने निधीची घोषणा करताना रुग्णांना ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार आहे.
- राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत मध्ये भरिव वाढ करण्याची घोषणा करताना विद्यार्थ्यांना आता मोफत गणवेश मिळणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
- राज्यातील रत्यांना निधी जाहीर करताना पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) या महाराष्ट्रातील शक्तिपीठाकडे जाणाऱ्या महामार्गासाठी ८६, ३०० कोटी रुपयांची घोषणा केली.
- महत्वकांक्षी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करून सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंतचा रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे.
- इंदूमिल येथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रलंबित स्मारक २०२५ पर्यंत राज्यशासन पूर्ण करणार आहे
- वयोश्री योजनेचा विस्तार करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत
- महिलांसाठी विषेश तरतूद करताना राज्य सरकारच्या वतीने अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करताना विविध योजना शासनाकडून राबवण्यात येणार आहेत. त्यामध्ये ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानात ४ कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच औषधोपचार, अंगणवाडी मदतनिसांना ५ हजार ५०० रुपये मानधन शासनाकडून देण्यात येणार आहे. याचबरोबर महिलांसाठी ५० शक्तिसदन उभारणार असून महिलांना एसटी प्रवासामध्ये सरसकट ५० टक्के सूट मिळणार आहे.
- यामध्ये लेक लाडकी योजनेंतर्गंत मुलगी जन्माला आल्यावर तीच्या खात्यावर 5 हजार राज्यशासन टाकणार असून ती १८ वर्षांची झाल्यानंकर तिला ७५ हजार रुपये मिळणार आसल्याची महत्वपुर्ण घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली.
- चौथ्या सर्वसमावेशक महिला धोरण राज्य शासन राबवणार असून यातून महीला सशक्तीकरणाकडे राज्य शासनाचे लक्ष आहे
- मासेमारीवर चरितार्थ चालणाऱ्या कुटुंबांच्या कल्याणासाठी ५० कोटींचा मत्स्यविकास कोष स्थापन करून त्यांना प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
- धनगर समाजाच्या उद्धारासाठी १००० कोटी रुपयांची तरतून या अर्थसंकल्पात केली असून महाराष्ट्र शेळी- मेंढी सहकार विकास महामंडळाची स्थापना राज्य शासन करणार आहे.
- आता अन्नधान्य किंवा शिधाऐवजी रोख रक्कम आता नागारिकांच्या थेट आधार बँक खात्यात जमा होणार असून प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी १८०० रुपये मिळणार आहे.
- अपघातग्रस्त शेतकऱ्यांना २ लाख रुपये मिळणार असून विदर्भ, मराठवाड्यातील १४ नैसर्गीक आपत्तीग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत देण्याचे घोषित झाले.
- देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गिय गोपीनाथ मुंडे अपघात योजना जाहीर करून शासनाकडून त्यांना आदरांजली वाहीली.
- राज्यातील गड- किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी ३०० कोटींची तरतूद केल्याचे अर्थमंत्र्यांनी घोषित केले.
- मागील सरकारच्या काऴात बंद पडलेली मागेल त्याला शेततळे ही योजन आता नव्याने सुरु केली जाणार आहे.तसेच मागेल त्याला ठिबक सिंचन योजनाही आमलात आणली जाणार आहे.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीकांचा विमा उतरवला जाणार असून सर्व शेतकऱ्यांचा पीकविम्याचा हप्ता राज्य सरकारच्या तिजोरीतून भरला जाणार आहे.
- राज्यशासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर अनुदान प्रति हेक्टरी १५ हजार रुपये देणार आहे
- नमो शेतकरी सन्मान योजना
अर्थसंकल्पात सगळ्यात महत्वाची घोषणा करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेची घोषणा करून केंद्र सरकारकडून शासनाकडून मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या 6 हजार या रकमेच्या अनुदानात महाराष्ट्र शासनाकडून आणखी 6 हजार रुपयांची भर टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षापोटी 12 हजार मिळणार आहेत. याचा लाभ १ कोटी १५ शेतकरी कुटुंबांना मिळणार असून त्यासाठी २०२४-२४ वर्षासाठी ६ हजार ९०० कोटी रुपये निधी प्रस्तावित असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितले. - आपला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अमृत काळातील हा राज्याचा पहिला अर्थसंकल्प असून तो पाच ध्येयांवर आधारित आहे. ही ध्येये पंचामृताप्रमाणे असून त्यामध्ये पहिले अमृत शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी, दुसरे अमृत महिला, अदिवासी मागासवर्ग ओबीसीसंह सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास, तिसरे अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, चौथे अमृत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम विकास, पाचवे अमृत पर्यावरण पूरक विकास असे त्यांनी अर्थसंकल्पाचे विभाजन करून सादररीकरण केले
महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे- फडणवीस सरकार आपला पहीलाच अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पातून लोकप्रीय घोषणा होणार की सर्वसामन्य लोकांना दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने मेटकुटीस आलेला शेतकऱ्यांच्या भावनांचा आणि कांद्यासह इतर शेतमालाचे पडलेले दर यांचाही प्रभाव या अर्थसंकल्पावर पडण्याची शक्यता बोलली जात असून अर्थमंत्री देवेंद्र पडणवीस कोणत्या घोषणा करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारकडून आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आल्यानंतर आर्थिक वर्षात राज्याचा विकासदर ९.१ टक्के इतका नमदू करण्यात आले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याच्या शक्यता आहे.