संतोष पाटील,कोल्हापूर
जिह्यात दरवर्षी तयार होणाऱ्या सरासरी सहा लाख क्विंटल गुळाला भौगोलिक मानांकनाचा (जीआय) फायदा कागदावर राहिला आहे. आजरा घनसाळ, सोलापुरी चादर, लासलगावचा कांदा 500, नाशिकची द्राक्षे , महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी 350 आदी उत्पादनांनी जीआय मानांकनामुळे जगाच्या बाजारपेठेत दमदार पावले टाकली आहेत. याउलट बाजार समितीची यंत्रणा पणन विभागाच्या सहकार्याने गुळ उत्पादक शेतकऱ्यांचे वैयक्तिक जीआय मानांकन करण्यात कमी पडल्यानेच कोल्हापुरी गुळाला हक्काची बाजारपेठ गमावण्याची वेळ येणार आहे.
कोल्हापूरी गूळासह चप्पल, आजरा घनसाळ यासह 24 कृषी उत्पादकांना भोगोलिक मानांकन साधारण बारा वर्षापूर्वी मिळाले. बाजार समितीने दोन वर्षापूर्वी जीआयची मुदतवाढ घेतली. मात्र, प्रत्यक्षात एकही गुळ उत्पादक जीआय मानांकन घेवू शकला नाही. हे यंत्रणेच सपशेल अपयश आहे. कोल्हापुरातील 80 टक्के गुळ गुजरात आणि राजस्थानला जातो. दहा हजार क्विंटल गुळ इंग्लड,अमेरिका,आखाती देश व ऑस्ट्रेलियात निर्यात होतो. जीआय मानांकनामुळे हक्काची बाजारपेठ मिळाल्यानेच कोल्हापुरी गुळाचा दर वाढेल, शेतकरी गुळ उत्पादनाकडे वळतील यासाठी जाणीपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. भौगोलिक वैशिष्ट्यामुळे, हवामान, संस्कृतीमुळे एखाद्या उत्पादनात त्याच्या उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष दर्जा, चव, रंग, वास उतरत असतात. तशीच विशिष्ट चव आणि रंगाबाबत कोल्हापुरी गुळाची खासियत आहे. जीआयमुळे इतर प्रदेशातल्या अनधिकृत उत्पादकांपासून भेसळ होणे, रास्त किंमतीपेक्षा कमी किंमत मिळणे आदींपासून संरक्षण मिळणार आहे. जीआय नोंदणीसाठी सुरुवातीला दहा वर्षे मुदत असते. आता आठ वर्षे निघून गेली आहेत. उरलेल्या दोन वर्षात ठोस काम करण्याची गरज आहे.
भौगोलिक मानांकन बाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, शेतकऱ्यांची नोंदणी करणे तसेच या शेतमालाची विक्री व्यवस्था, निर्यात याबाबत कामकाज करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी बाजार समिती आणि कृषी पणन मंडळ समन्वयाचे काम करते. एका चर्चासत्र आयोजनासाठी पणनकडून बाजार समितीला 10 हजार तर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आठशे रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. वर्षात एका तालुक्यात तीन प्रशिक्षण वर्ग घेता येतात. मात्र शेतकऱ्यांना जीआय मानांकनाचे फायदे पटवून देवून प्रत्यक्षात नोंदणी करण्यात अपयशी ठरली.
शेतकऱ्यांकडून प्रतिसाद नाही
कोल्हापुरी गुळाचे शेतकऱ्यांनी जीआय मानांकन घ्यावे, यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची कवाडे खुली करुन घ्यावीत. भेसळीला आळा घालावा. कोल्हापुरी गूळ म्हणून इतर गुळाची होणारी विक्री यातून थांबावी. शेतकरी आणि ग्राहकाचे नुकसान टाळावे यासाठी यंत्रणा पाठपुरावा करत आहे. अनेक बैठका आणि चर्चा सत्र घेवूनही शेतकरी प्रतिसाद देत नसल्याची माहिती बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी दिली.
वैयक्तिक जीआय मानांकनाची आकडेवारी
कोल्हापुरी गुळ – 000
सांगली हळदी 100
आजरा घनसाळ 300
सांगली बेदाणा – 150
लासलगावचा कांदा- 500
नाशिकची द्राक्षे – 400
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी- 350
भौगोलिक चिन्हांकन (जी.आय.) म्हणजे काय?
हे एक मानांकन आहे. हे मानांकन त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषीविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरतात. या मालाचा उगम त्या विशिष्ट प्रदेशातीलच असतो. जी. आय. मानांकन हे एखादी वस्तू/पदार्थ/उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेवा व्दितीय असल्याची पावती (मार्कींग) आहे.
जी. आय. नोंदणीचे फायदे काय आहेत?
जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळते. जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादनाच्या नोंदणीकृत उत्पादकांशिवाय होण्राया जी. आय. मानांकनाच्या अनाधिकृत वापरावर पायबंद घालता येतो. मानांकनप्राप्त उत्पादनांच्या निर्यातीला कायदेशीर संरक्षणाखाली चालना मिळते. उत्पादकांच्या आर्थिक समृद्धीला चालना मिळते. ‘जागतिक व्यापार संघटने‘च्या इतर सदस्य देशांमध्ये कायदेशीर संरक्षण मिळवण्यास यामुळे मदत होते.
जी. आय. नोंदणीसाठी कोण अर्ज करू शकतो?
कायद्याने किंवा कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेली कोणतीही संस्था, संघटना, अधिकारी यंत्रणा, किंवा कोणताही उत्पादकयांच्यापैकी कोणीही जी. आय. नोंदणीसाठी अर्ज करू शकते. काही लोकांनी, उत्पादकांनी अधिकृतरीत्या स्थापन केलेली संघटना किंवा कोणतीही अधिकृत यंत्रणा जी. आय. उत्पादनाची नोंदणीकृत मालक असते. जी. आय. नोंदणी करणे सक्तीचे नाही. मात्र नोंदणी केल्यामुळे कायदेशीर उल्लंघनाच्या वेळी कारवाई करण्यासाठी अधिक चांगले कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. नोंदणीकृत जी. आय. मानांकनप्राप्त वस्तूंचा अधिकृत वापरकर्ता म्हणून त्या वस्तूचे उत्पादन केलेला उत्पादक असतो. जी. आय. नोंदणी ही दहा वर्षांसाठी केली जाते. त्यापुढे दर दहा वर्षांसाठी आपण सातत्याने नोंदणीचे नूतनीकरणही करू शकतो.
फरक काय?
ट्रेडमार्क (व्यापारचिन्ह) हे व्यापारासंदर्भात वापरले जाणारे चिन्ह आहे. हे चिन्हांकन एका उद्योगाचा माल किंवा त्याची सेवा यांना इतर उद्योगांपासून वेगळे बनवते. मात्र जी. आय.चा वापर विशिष्ट भौगोलिक परिसरातील खास गुणधर्म असलेला माल ओळखण्यासाठी केला जातो.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









