न्यूयॉर्क
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी भारतीय वंशाचे वकील अरुण सुब्रमण्यन यांची न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती केली आहे. सुब्रमण्यन हे न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्हय़ातील न्यायालयात सेवा बजावणारे पहिले दक्षिण आशियाई न्यायाधीश ठरले आहेत. अमेरिकेच्या सिनेटने सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. अरुण सुब्रमण्यन यांनी 2006-27 दरम्यान अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश रुथ बेडर जिन्सबर्ग यांच्यासाठी लीगल क्लार्क म्हणूनही काम केले आहे.









