कोल्हापूर प्रतिनिधी
ग्राहकांना शुध्द सोने मिळावे म्हणून, यासाठी देशात कायद्याने हॉलमार्क या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) यांच्या अंतर्गत व नियमानुसार देशातील सराफ व्यावसायिकांना आता काम करावे लागणार आहे. बीआयएसकडून हॉलमार्कबाबत वेळोवेळी बदल केले जात असते. . एक एप्रिलपासून हॉलमार्क नियमामध्ये बदल होणार असल्याचे सराफ व्यावसायिककडून स्पष्ट झाले आहे.
16 जूलै 2021 पासून पूर्वीच्या हॉलमार्कबाबत बदल करण्यात आले होते. दोन ग्रॅम पुढील कोणत्याही सोन्यावर हॉलमार्क करणे बंधनकारक केले आहे. पूर्वीच्या सिम्बॉलबरोबर, आता ऑनलाईन डिजिटल सहा अक्षरी (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन डिजिट-एचयूआयडी) सिम्बॉल पॅरेटनुसार देण्यात आला आहे. यामध्ये दुकानासह इतर माहीती या सिम्बॉलमध्ये नोंद होणार असल्याने, या प्रत्येक दागिन्याची ऑनलाईन नोंदणी बीआयएसकडे होणार आहे. यामुळे बोगस हॉलमार्क दागिने उघडकीस येणार आहेत. बीआयएसने केलेल्या कारवाईमध्ये फक्त हॉलमार्क असलेंले पण ब्युरोकडे नोंदणी नसलेले दागिने उघडकीस आल्याने, अशावर कारवाई करण्यात आली असल्याचे सराफ बाजारामधून सांगण्यात आले.
कोल्हापूरात सहा हॉलमार्क सेंटर सुरू असून, त्यापैकी दोन सेंटर बंद झाले आहेत. लवकरच नवीन हॉलमार्क सेंटर सुरू होणार असल्याने, याची संख्या पाच इतकी होत आहे. नवीन हॉलमार्क सेंटर सुरू करण्यासाठी किमान एक कोटी रूपयाची गुंतवणूक करावी लागते. त्याचबरोबर संबधित विभागाकडून कायदेशीर परवानगी घेण्यासाठी किमान एक वर्षे तरी लागत आहे. यापूर्वी दागिन्यावर फक्त हॉलमार्कचा शिक्का मारला जात होता. यामुळे सर्व दागिन्यावर हॉलमार्क असून देखील, याची नोंदणी भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) कडे होत नसे. यामुळे हॉलमार्कबाबत ब्युरोकडे तक्रारी आल्याने, मोठया शहरातील सराफ व्यावसायिकावर कारवाई करावी लागली.
हॉलमार्कमुळे लोकांना दागिन्याबाबत अधिक विश्वासर्हता वाढणार आहे. हॉलमार्कच्या सुरक्षिततेमुळे सोने तारण, विक्री वा परतावा मिळणे सोपे होणार आहे. यासाठी ग्राहकांनी हॉलमार्क दागिन्यांची खरेदी करावी असे आवाहन ही करण्यात येत आहे. कोल्हापूर शहर सराफ संघटनेकडे सुमारे 800 सराफ व्यावसायिक सभासदांची नोंदणी आहे. या सराफ व्यवसायापैकी 50 टक्के सराफ व्यावसायिक चांदी व्यावसायिक आहेत.. चांदी व्यावसायिक व कारागिरांना हॉलमार्क नसून फक्त सोने विक्रेत्यानांच हॉलमार्क बंधन केलेले आहे.
ग्राहकासाठी बीआयएस केअर अॅप
लोकांना सोन्यांची शुध्दता समजावी यासाठी आता बीआयएस ने केअर अॅप सुरू केली आहे. आपल्या दागिन्याचा नोंद आता बीआयएस कडे नोंद होणार आहे. ग्राहकांना आपल्या दागिन्याबाबत संशय आल्यास हे अॅप उघडल्यास दागिन्याबाबत माहीती मिळणार आहे.









