वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱया बिली जिनकिंग चषक सांघिक आशिया-ओशेनिया गट-1 लढतीसाठी अखिल भारतीय टेनिस संघटनेने भारतीय टेनिस संघाची घोषणा केली असून या संघात वैदेही चौधरीला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, या संघाच्या कर्णधारपदी विशाल उप्पलच्या जागी शालिनी ठाकुर-चावलाची नियुक्ती करण्यात आली आहे. या संघामध्ये वरि÷ टेनिसपटू अंकिता रैना आणि करमान कौर थंडी यांचाही समावेश आहे.
अलीकडेच 23 वषीय वैदेही चौधरीने गुरुग्राम येथे झालेल्या आयटीएफच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविल्याने तिला या आगामी स्पर्धेसाठी संघात संधी देण्यात आली. आयटीएफ टूरवरील स्पर्धेतील वैदेहीचे हे दुसरे विजेतेपद आहे. गुरुग्राम येथे झालेल्या स्पर्धेत वैदेहीने संदीप्ती सिंगचा पराभव केला. डब्ल्यूटीएच्या मानांकनात 492 व्या स्थानावर असलेल्या चौधरीने अलीकडेच ग्वाल्हेरमध्ये झालेल्या आयटीएफ टूरवरील स्पर्धेत आपले पहिले विजेतेपद मिळविले आहे. तसेच त्यानंतर तिने झाजेर येथे झालेल्या आयटीएफ टूरवरील स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. नंदनबाळच्या नेतृत्वाखालील निवड समितीने बिली जिनकिंग चषक लढतीसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात रिया भाटियाला वगळण्यात आले असून ऋतुजा भोसलेचा समावेश केला आहे. भारतीय महिला टेनिस संघासाठी आता राधिका कानिटकर ही नवी प्रशिक्षिका लाभली आहे. या संघाच्या कर्णधारपदी विशाल उप्पलच्या जागी शालिनी ठाकुर-चावला हिची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय टेनिस संघ- अंकिता रैना, करमान कौर थंडी, ऋतुजा भोसले, सहजा यमलापल्ली, वैदेही चौधरी, श्रीवल्ली भामीदीप्ती (राखीव), शालिनी ठाकुर-चावला (कर्णधार), प्रशिक्षक राधिका कानिटकर.









