आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी विधानसभेत अजब दावा केला आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचे मांस खातात. राज्यातील वाढलेल्या भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांना आसाममध्ये लोकांसाठी खायला पाठवले पाहिजे असे म्हटले आहे असे विधान केले आहे. भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या समस्यांबाबत आमदार प्रताप सरनाईक आणि अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान कडू हे राज्य विधानसभेत बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, “आसाममध्ये भटक्या कुत्र्यांना चांगली मागणी आहे. त्यांना 8 हजार रुपयांपर्यंत किंमत मिळून त्याची विक्री होते. राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना आसाममध्ये पाठवायला हवे,” असा खळबळजन्क दावा त्यांनी करून “महाराष्ट्रासाठी हा विचार करणे एक व्यवहार्य पर्याय ठरेल.” असे ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याऐवजी एकाच शहरात हा प्रयोग सुरू करण्याचा आणि तेथून रस्त्यावरील कुत्रे आसामला पाठवण्याचा कृती आराखडाच त्यांनी विधानसभेत स्पष्ट केला.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या यांच्या या टिप्पण्यांमुळे वादाला तोंड फुटले असून प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी त्यांचे विधान अपमानजनक आणि अमानवीय असल्याची टीका केली आहे.