परिसरात भीतीचे वातावरण
कुपवाड प्रतिनिधी
कुपवाड शहरातील गोमटेशनगर येथे राहणारे अशोक शिंदे हे कुटंबियासोबत सलग आठ दिवस सुट्टी काढून देवदर्शनाला गेले होते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी पाळत ठेवून घरफोडी कऊन तब्बल साडेचार लाखांच्या सोन्याच्या दागिन्यावर डला मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घरफोडीची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत कुपवाड पोलीसात नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी अशोक महादेव शिंदे (रा. गोमटेशनगर गली नंबर 2) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घरात तिजोरीत ठेवलेले 4 लाख 46 हजार 300 ऊपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. चोरट्यांनी घरालगतच्या संरक्षक भिंतीवरून उडी माऊन घरात प्रवेश केला आणि बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात चोरी केली असावी, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादी अशोक शिंदे हे कुटंबियासोबत रविवारी 26 फेब्रुवारी रोजी घराला कुलूप लावून तिरुपती देवदर्शनाला गेले होते. ते शनिवारी सकाळी घरी परतले. यावेळी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसला. यावेळी दरवाजाही उघडलेल्या स्थितीत होता. त्यामुळे आपल्या घरात चोरी झाल्याचा शिंदे यांना संशय आला. शिंदे यांनी घाईगडबडीने घरात जाऊन पहिले असता बेडरूममधील लोखंडी तिजोरी व लाकडी कपाटाचेही कुलूप तोडल्याचे दिसले.
यावेळी कपाटातील कपडे बेडवर विस्कटून पडले होते. अज्ञात चोरट्यांनी तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसले. यावेळी फिर्यादी शिंदे यांनी याबाबत कुपवाड पोलिसांना आपल्या घरात चोरी झाल्याची माहीती दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ठसे तंज्ञाना पाचारण करून तपासणीसाठी दरवाजा व इतर ठिकाणचे ठसे घेतले. याबाबत संशयित चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत. दरम्यान, कुपवाड परिसरात घरफोडी व चोरीच्या घटना दवसां†दवस वाढत असून पा†लसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी, अशी नागा†रकांतून मागणी होत आहे.








