Uddhav Thackeray On Pune By Election : वापरा आणि फेका ही भाजपची नीती भाजपला भोवली. हीच नीती ते सर्वत्र वापरत आहेत. शिवसेनेबरोबर टिळक कुटुंबाबरोबरही त्यांनी हेच केलं. इतक्या वर्षाच्या भ्रमातून जर कसबा मतदारसंघ बाहेर पडत असेल तर देशाला बाहेर पडायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली.
पुणे पोटनिवडणुकीचा निकालत कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान उध्दव ठाकरे यांनी भाजप-शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
विरोधी पक्षांना मुख्यमंत्री देशद्रोही म्हणाले नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर देशद्रोही कोणाले म्हणाले हे त्यांनी जाहीर करावं.बेहंदशाहीला जर वेळीच रोखलं नाही तर काळ सोकावेळ आणि काळाबरोबर देशामध्ये हुकूमशाही देखील सोकावेल असेही ते म्हणाले. पुढे ट्विटमध्ये ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. हा निकाल देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने दिलासा देणारा असल्य़ाचेही त्यांनी म्हटलय.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








