सामाजिक कार्यकर्ते ध्रुवबाळ उर्फ डी के सावंत यांचे मुंबई येथे निधन
Behind the curtain of time, personalities who are struggling for the tourism and railway issue of Konkan!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि रेल्वे प्रश्नासाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते ध्रुवबाळ उर्फ डी के सावंत वय 69 यांचे मुंबई येथे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे मूळ बांबांदा येथील असलेले डी के सावंत माजगाव येथे राहत होते . मूळ बांदा डोंगरवाडी येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये गेले पंधरा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते . त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सून नातवंडे जावई असा परिवार आहे शिवप्रसाद सावंत यांचे ते वडील होत.जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला आगळीवेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी व‘मामाचा गाव ‘ ही संकल्पना राबवली स त्यांच्या इच्छेप्रमाणे मुंबई येथेच त्यांचा देहदान करण्यात येणार आहे. सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळीची त्यांचा संबंध होता मंत्रालयातही ते अनेकांची कामे करीत असतात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते.
बांदा डिंगणे येथील पटेकर सावंत कुटुंबीयात जन्मलेले डि के इतर युवकांप्रमाणेच शिक्षणानंतर मुंबईत गेले. तेथे सुरुवातीला एका बँकेत त्यांनी नोकरी केली. त्यानंतर तिथे जास्त काळ न राहता त्यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला राहिले. त्यांनी मंत्रालयात कॅन्टीनही चालवले होते.ते गावी परतले व माजगाव येथील मळगाव घाटीच्या वरच्या भागात डी. के. टुरिझम हा अनोखा असा पर्यटन प्रकल्प साकारला. . , जिद्द चिकाटी परिश्रम व घेतलेल्या ध्यास याच्या बळावर त्यांनी हा प्रकल्प यशस्वी करून दाखवला. त्यानंतर मामाचा गाव ही संकल्पना राबवून देश-विदेशातील पर्यटकांना कोकणातील अस्सल पर्यटन घडवून आणले. दाभिळ व डिंगणे मामाचा गाव ही संकल्पना राबवून त्यांनी कोकणच्या पर्यटनाला वेगळी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना ही विविध सेवा मिळवून देण्यासाठी ते नेहमी झटत होते.सडेतोड स्वभाव व भ्रष्टाचार विरोधातील त्यांचा लढा सर्वांनाच परिचित होता. पर्यटन क्षेत्रात चाललेला भ्रष्टाचार त्यांनी अनेक वेळा उघड केला होता. त्या विरोधात त्यांनी नेहमीच आपली परखड भूमिका वेळोवेळी मांडली होती. कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला लढा देत ते भ्रष्टाचारा विरोधातही मोठा लढा देत होते. तसेच सिंधुदुर्गच्या पर्यटनासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले होते. त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









