जगनमोहन सरकारचा निर्णय ः तिरुपती देवस्थान प्रत्येक मंदिराला 10 लाख देणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंध्रप्रदेशात सुमारे 3000 मंदिरे बांधली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी नुकतीच दिली. हिंदू धर्माचे रक्षण आणि प्रचार करण्यासाठी हिंदू मंदिरे बांधण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक जिह्यात मंदिर बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून सुधारित यादीमध्ये 1,465 नवीन मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या श्री वाणी ट्रस्टकडून प्रत्येक मंदिराच्या बांधकामासाठी 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. सध्या 1,330 मंदिरांचे बांधकाम सुरू झाले. आता या यादीत 1,465 मंदिरांचा समावेश झाला आहे. काही आमदारांच्या विनंतीवरून आणखी 200 मंदिरे बांधली जातील.









