ब्रह्म देवाने कमंडलुतील जलाने विष्णुचे पाय धुतले. त्याचे तीन प्रवाह स्वर्ग, पाताळ, मृत्यू या तीन ठिकाणी वाहू लागली म्हणून त्रिपथगामिनी. ज्ये÷ शुक्ल प्रतीपदा ते दशमीपर्यंत हा गंगेचा जन्मोत्सव चालतो. हस्तनक्षत्रावर भूलोकी प्रकट झाली. दहा पातकांचा नाश करणारी दशहारि म्हणून गंगा दशहरा. दहा प्रकारची धान्य, वस्तू फळं दान म्हणून देतात.
‘दशम्या शुक्ल पक्षे तू ज्येष्ठ मासे कुजेहनी
अवतीर्णा यतः स्वर्गात हस्तरक्षेच सरिद्वया’
पुष्पदंत नावाच्या गंधर्वाने तिला आकाशगंगा नावाने संबोधले आहे. ती तिच्या शुभ्र फेसाने तारांगणे झाकून टाकते. भगीरथाने ही गंगा मिळावी म्हणून तप करायला सुरूवात केली. आकाशात हिला मंदाकिनी म्हणतात तर भूभागावर भोगावती. सगर राजाने 100वा यज्ञ सुरू केला, अश्व सोडला, 60000 प्रजानन तो शोधायला निघाले. इंद्राने तो कपिल मुनींच्या आश्रमात लपवला. प्रजाजन त्यांच्या अंगावर धावून गेले. कपिल मुनींनी सगळय़ांना भस्म केले. आता सगराने नातवाला राज्य देऊन या घटनेचा शोध घ्यायला लावला. त्याने तपश्चर्या केली पण तिही व्यर्थ, नंतर राजा दिलीपानेही प्रयत्न केला उपयोग झाला नाही. त्याच्या मुलाला म्हणजे भगीरथाला यश आले. गंगेचा एक केस शंकराच्या अंगावर पडल्यामुळे त्याने गंगेला पृथ्वीवर नदीरूपात जन्म घेशील असा शाप दिला होता. पण ऊःशाप देउन जटेत धारण करीन हेही सांगितल्याने भगिरथाने शंकराची आराधना सुरू केली.
गंगा नदी….. ब्रह्मदेवाने सृष्टीतील अनेक रूपात म्हणजे वृक्षवल्ली, डोंगर दऱया, नदीनाले समुद्र, फळंफुलं, किटक, प्राणी निर्माण केले. मानव या पंचमहाभूतांना देव मानू लागला. सृष्टीतील रौद्र रूप पाहून यज्ञयाग करू लागला. कंदमुळे फळे धान्य पोट भरू लागले तर नदी तलाव तहान भागवू लागली. आप म्हणजे जल पृथ्वीवर आणण्याचे काम भगीरथाने केले. त्या गंगेची महती शंकराचार्य, जगन्नाथ पंडित, आणि अनेक जणांनी गायली. गंगास्नान, गंगापूजन, कुंभमेळा, सिंहस्थ, कन्यागत पर्व, दशहरा, संक्रांत, कार्तिक स्नान, माघस्नान, एकादशी स्नान पुण्यप्रद मानले आहे. नदी म्हणजे मानवाची सखी, प्रत्यक्ष जीवन, विष्णुलोक प्राप्त करण्याचा मार्ग. या सर्व नद्या पार्थीव रूपात पूजल्या जात असल्यातरी स्नानाने मुक्त होता येते.
लग्न कार्यात नदीला प्रथम आमंत्रण देण्याची प्रथा नंतर गणपती, ग्रामदेवता. बाळाच्या जन्मानंतर त्याला नदीचे दर्शन आधी, पाण्याचा स्पर्श डोळय़ाला करून सात नद्यांचे सात विडे मांडून भिजलेली हरभरा डाळ ठेवून, सात आसरांची पूजा, नदीची ओटी भरण्याच्या पद्धती सर्वत्र पहायला मिळतात. गौरी गणपतीत विसर्जन नदीतच. त्रिपुरी पौर्णिमेस दिवे सोडायची प्रथा. कार्तिकातही नदीत दिवे आणि स्नान याचं महात्म्य. मंगलाष्टकात नद्याची नावे आवर्जून. कारण नदीसारखं सागराशी एकरूप होणारे जीवन स्विकारण्याचा उपदेश मिळतो. नदीसारखं निस्वार्थ, कृतार्थ जीवन नववधूला सांगण्याचा मार्ग.
‘गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा.
कावेरी शरयू महेद्र तनया चर्मण्वती वेदिका
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याताचिया गंडकी
पूर्णापूर्ण जलती समुद्र सहितं कुर्यात सदा मंगलम.’
राग, लोभ, मोह, द्वेष, गर्व, मत्सर, भेदभाव, आळस, सर्व सोडून जी पुढेच जात असते. परोपकार, कर्तव्य नि÷ा हाच जगण्याचा उद्देश ठेवून वाहणारी नदी.








