कामगारही मारतात दिवसेंदिवस दांड्या
म्हापसा : म्हापसा नगरपालिकेत सध्या कचरा समस्या जटील बनली असून अशा परिस्थितीत कामगारवर्गही कामचुकारपणा करीत असल्याने त्यांना हाताळणेही म्हापसा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीना कठीण होऊन बसले आहे. कामगाराबरोबर कचऱ्याच्या गाड्यांतही दिवसेंदिवस बिघाड होत असल्याने कचरा उचलण्यास त्रासदायक होत असल्याची माहिती म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कचरा आऊट सोरसींग करण्याची प्रक्रिया सुरू असून ती झाल्यावर काही प्रमाणात कचऱ्याची समस्या सुटेल, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. येथे कचरा प्रकल्प वा व़ॉर्डात काम करणारे कामगार दिवसेंदिवस रोजंदारीवर आहे. ते अचानक कोणतेही कारण पुढे करून घरी राहतात त्यामुळे कचरा पडून राहतो, असे मुख्याधिकारी म्हणाले. एकदा एका वॉर्डात पाच कामगार कचरा उचलण्यासाठी घालण्यात आले खरे मात्र पाचही कामगार गैरहजर राहीले अशी स्थिती आहे असे त्यांनी सांगितले. पालिका बैठकीत अन्य 40 अतिरिक्त कामगार घेण्याचा ठराव मंजूर झाला आहे आणि ते कामगार घेण्यात येणार आहेत. यात काही प्रमाणात कचरा समस्या सुटेल असे मुख्याधिकारी म्हणाले. रिक्षा सध्या सर्वत्र कचरा उचलत आहे.
स्वत:चे पैसे खर्च करतो
सध्या 15 ट्रक सुरू असले तरी कधी कधी दिवसाला 3 ते 4 गाड्यांचे ब्रेकडाऊन होते. आपण आपल्या खिशातील पैसे खर्चून ट्रक दुऊस्त करून घेतले आहे, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. पालिकेकडे राखीव पैसे नाहीत काय? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्याधिकाऱ्यांना केला असता कधी कधी गॅरेज मालक पार्ट गेल्यास प्रथम आगाऊ पैसे मागतात त्यावेळी खिशातील द्यावे लागतात. अन्यथा ते काम हाती घेत नाही असे मुख्याधिकारी म्हणतात.









