नवी दिल्ली
दिल्लीतील कालिंदी कुंज भागात म्यानमारच्या एका महिला शरणार्थीवर कथितपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या महिलेचे अपहरण करत एका रिक्षाचालकाने तिला बेशुद्ध केले होते, यानंतर 4 जणांनी तिच्यावर कथितपणे सामूहिक बलात्कार केला आहे. ही महिला नोंदणीकृत शरणार्थी आहे. दिल्ली पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. तसेच महिलेच्या जबानीत सामूहिक बलात्कारानंतर तिला दोन जणांनी मदत केल्याचे नमूद आहे.









