वारणानगर / प्रतिनिधी
अत्याधुनिक यंत्रसामग्री उभा करून वारणा दूध संघाचे माध्यमातून ग्रामीण परीसराचा विकासआ. विनय कोरे यांनी केला असल्याचे गौरव उद्गार केंद्रीय सुक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण यांनी केले. तात्यासाहेब कोरेनगर ता. पन्हाळा येथील श्री वारणा सहकारी दूध संघाच्या मुख्य दुग्धालयात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत नूतन विस्तारीत दुग्धालय प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व संघाचे अध्यक्ष आ.विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ.निलमताई राणे, संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, सूक्ष्म,लघू मध्यम खात्याचे अधिकारी अभय दफ्तरदार, दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त
श्रीकांत शिपूरकर, उपायुक्त प्रशांत मोहोड, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रकाश आवटे, बँक ऑफ इंडीयाचे आर.पी.कुलकर्णी, आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले. मंत्री राणे यांचा सत्कार डॉ विनय कोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी मंत्री राणे यांनी दुग्धालयातील विविध प्रकल्पांबद्दलची माहीती घेतली.संघातील अत्याधुनिक यंत्रसामग्री, शेतकरी दूध उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व उपक्रम यांचे कौतुक राणेनी केले. यानंतर संघाकडील व डॉ. कोरे यांच्या गीर गायींच्या गोठ्यास त्यांनी भेट देवून प्रशंसा केली.
आमदार कोरे यांनी संघाकडून वर्षभरातच मुख्य दुग्धालतील विस्तारीकरण व नूतनीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून आता संघाची साडेसात लाख लिटर दैनंदिन दूध हाताळणी क्षमता होणार असल्याची माहिती मंत्री राणे यांना दिली.
यावेळी संघाचे सर्व संचालक मंडळ, दलितमित्र नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. अशोकराव माने, पुण्याचे दुग्ध विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी संपत जांभोळे, शासकीय योजनेचे महाव्यवस्थापक नामदेव दवडते, अकौंट्स मॅनेजर सुधीर कामेरीकर यांच्यासह संघाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









