Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुरगुड पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच हसन मुश्रीफ यांचे समर्थक आणि संतांची घोरपडे साखर कारखान्यांच्या काही सभासदांचं आंदोलन सुरू केलं आहे. तसेच सभासद आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर मुश्रीफांच्या घरावर ईडीने छापा टाकला. दरम्यान कागल तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सोमय्या यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यानंतर मुश्रीफ यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागल येथील विवेक कुलकर्णी व अन्य ज्या १६ लोकांनी मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Previous Article‘न्यायालय मला निर्देश देऊ शकत नाही’
Next Article निवडणुकीत अनेकदा पोलिसांच्या मदतीने पैशांचे वाटप









