महसूल मंत्र्यांची न्यायालयात उपस्थिती
मडगाव : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्याविऊद्धचा खटला मडगावच्या मुख्य सत्र न्यायालयात सुऊ झाला आहे. यापूर्वी हा खटला पणजीच्या सत्र न्यायालयात चालू होता. राजकारणी व्यक्तीविऊद्ध दाखल केलेल्या खटल्यांची सुनावणी दक्षिण गोव्याचे मुख्य सत्र न्यायाधीश ईर्शाद आगा यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आल्यामुळे हा खटला शुक्रवारपासून मडगावच्या न्यायालयात सुऊ झाला आहे. संशयित बाबुश मोन्सेरात काल शुक्रवारी न्यायालयात उपस्थित होते.









