यंदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-बैलूर परिसरासह खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागात यंदाच्या हंगामात ऐन फेब्रुवारीपासूनच काजू उत्पादनाला प्रारंभ झाल्यामुळे या भागातील काजू उत्पादक शेतकरीवर्ग सुखावला आहे. चालूवषी या भागात प्रारंभापासूनच काजू उत्पादनासाठी अनुकूल वातावरण आहे. डिसेंबरातच काजू बागा बहरल्या होत्या. काजू फळधारणेसाठी पोषक वातावरण असल्यामुळे जानेवारीपासूनच काजू फळधारणेला प्रारंभ झाला होता. यावषी पहाटेच्यावेळी पडणारे धुके तसेच ढगाळ वातावरण नसल्यामुळे मोहर करपणे तसेच कोवळ्या काजू बियांच्या गळतीचे प्रमाण अत्यल्प आहे. फळधारणेसाठी नैसर्गिक अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे काजू उत्पादनाच्या हंगामाला फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासूनच प्रारंभ झाला आहे. दरवषी काजू उत्पादनाला मार्चपासून प्रारंभ होत होता. काजू उत्पादनासाठी बेळगाव-खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागात कोकणच्या धर्तीवर अनुकूल वातावरण असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या माळरानावरील जमिनीत मोठ्या प्रमाणात काजू झाडांची लागवड केली आहे. काजू हे या भागातील एक प्रमुख नगदी पीक असून कमी उत्पादन खर्चामध्ये शेतकरीवर्गाला जादा उत्पन्न मिळते. मात्र मागील दोन-तीन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काजू उत्पादकांना मंदीचा फटका बसला होता. तसेच प्रतिकूल वातावरणामुळे गेल्या दोन वर्षांपासून काजू उत्पादनातही घट झाल्यामुळे काजू उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता.
सरकारने काजू पिकासाठी हमीभाव जाहीर करावा
यावषीच्या काजू उत्पादनाचा हंगाम मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे काजू उत्पादनात वाढ होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांना कमी भावाचा फटका बसण्याची शक्मयता असल्यामुळे सरकारने काजू पिकासाठी हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. सध्या काजू उत्पादनाला प्रारंभ झाल्यामुळे शेतकरीवर्ग काजू बागांच्या साफसफाईच्या कामात गुंतला आहे.









