नवी दिल्ली
पुरवठा साखळी प्रभावीत असतानाच जग्वार लँड रोव्हर (जेएलआर)च्या व्यवस्थापकीय संचालकपदी राजन अंबा यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आहे. सदरची माहिती शेअरबाजाराला देण्यात आली असून सध्याला राजन हे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सचे उपाध्यक्ष (सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर केअर) ची जबाबदारी सांभाळत आहेत. जेएलआरची नवी जबाबदारी राजन हे येत्या 1 मार्चपासून सांभाळणार आहेत.









