प्रतिनिधी / बेळगाव
बसरीकट्टी येथील युवकाच्या खूनप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांनी ही माहिती दिली आहे.
सोमनाथ गुंडू गोमण्णाचे (वय 25, रा. तानाजी गल्ली, निलजी), प्रशांत उर्फ परशुराम वसंत मोदगेकर (वय 27, रा. ब्रह्मनगर, निलजी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. बेळगाव ग्रामीणचे एसीपी गोपालकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर तिगडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
20 फेब्रुवारीच्या रात्री मारुती उर्फ पवन परशराम खन्नुकर (वय 32, रा. बसरीकट्टी) या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह गावाजवळील एका विहिरीत टाकून देण्यात आला होता.
मंगळवारी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला होता. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.









