Administration’s hammer on encroachments in Kharepatan markets
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण बाजारपेठ ही ऐतिहासकालीन बाजारपेठ म्हणून ओळखली जाते पूर्वीच्या काळी या बाजारपेठेतूनच मोठमोठे व्यापार होत असत त्यामुळे ही बाजारपेठ पूर्वीपासूनच प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून ओळखली जाते परंतु सध्याच्या काळात या बाजारपेठेची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याची दिसून येत आहे बाजारपेठेतील रस्ता संपूर्णपणे गायब झाल्याचे व व्यापारी पेठेतील व्यापाऱ्यांनीच आपल्या दुकानांची बांधकामे रस्त्याच्या दिशेला वाढवून अधिकृतपणे बांधकाम केल्याने या बाजारपेठेमधून रहदारी करणे देखिल त्रासदायक होत आहे . परंतु आता मात्र या बाजारपेठेला उर्जीतावस्था येण्यासाठी खारेपाटण ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशनच्या वतीने कसोशीने प्रयत्न केले जात आहे यामध्ये पुर वित्तहानी मधून या बाजारपेठेतील रस्त्याला रुपये वीस लाख एवढे मंजूर झाले असून त्या बाजारपेठेचे रस्त्याचे काम लवकरच सुरूहोण्या बाबत कार्यवाही चालू करण्यात आली आहे परंतु व्यापारी व काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या मागणीनुसार या रस्त्याबरोबरच बाजारपेठेमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ते गटाराचे नियोजन असणे आवश्यक आहे खारेपाटण बाजारपेठ पुरग्रस्त बाजारपेठ असल्याने या ठिकाणी उद्भवणाऱ्या पुराच्या समस्येला सुरुवातीलाच उपायोजना करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे खारेपाटण व्यापारी पेठेतील सांडपाणी हे सुद्धा निचरा होण्यासाठी योग्य उपाय योजना होणे गरजेचे असल्याने या रस्त्या सोबतच गटार बांधकामाचे सुद्धा नियोजन असावे अशी मागणी जोर धरू लागली अखेर या बाजारपेठेमधून गटारासहित रस्त्याचे काम करण्यात येणार असल्यचे सांगण्यात आले परंतु अनधिकृत बांधकामामुळे या बाजारपेठेची रस्त्याची रुंदी फारच कमी झाल्याने रस्त्यासहित गटारे करता येणे शक्य नाही असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
परंतु जर व्यापाऱ्यांनी सहकार्य केले व अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली तर सुसज्ज गटारा सहित एक विस्तृत रस्ता या ठिकाणी तयार होऊ शकतो असे खारेपाटण ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले या संदर्भात खारेपाटण व्यापारी असोसिएशन व ग्रामपंचायत यांची संयुक्त बैठक लावून यामध्ये अनधिकृत बांधकाम तोडून रस्ता व गटाराचे काम मार्गी लावावे असा ठराव करण्यात आला या ठरावाची अंमलबजावणी म्हणून आज गुरुवार दिनांक 24 रोजी प्रशासकीय अभियंता श्री सुतार, तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ प्राची ईस्वलकर, उपसरपंच मयूर गुरव व इतर ग्रामपंचायत कर्मचारी व व्यापारी यांच्या संयुक्त उपस्थित होते बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामाची मोजमापे घेण्यात आली. या मोजणी अंतर्गत कायद्याच्या चौकडीमध्ये बसवून जेवढी बांधकामे काढावी लागणार आहेत त्यावर प्रशासनाचा हातोडा पडणेची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्या संदर्भातील योग्य ती कार्यवाही प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल बाजारपेठेतील रस्ता किमान 20 फूट रुंद असण्याची गरज असल्याचे शासकीय अभियंता श्री सुतार यांनी सांगितले आहे व यानुसारच सध्याचे मोजमाप करण्यात येत आहे या सर्व प्रक्रियेमध्ये बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे सहकार्य फार मोलाचे ठरणार आहे आपल्या बाजारपेठेला उर्जितवस्था यावी बाजारपेठेतील रहदारी वाढावी याकरिता बाजारपेठेमध्ये रस्ता व सांडपाण्याची नीचरा असणे फार आवश्यक आहे त्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत व प्रशासनाच्या मागे खंबीर उभे राहून हे काम पूर्णत्वास नेण्यास सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत सरपंच प्राची इस्वलकर यांनी केले आहे.
खारेपाटण / प्रतिनिधी