मुंबई
भारतातील दागिन्यांच्या क्षेत्रात कार्यरत जॉयअलुकास यांनी आपला आयपीओ सादरीकरणाचा कार्यक्रम तुर्तास मागे घेतला असल्याची माहिती आहे. सदरची माहिती कंपनीने शेअरबाजाराला दिली आहे. बाजारातील नियामक संकेतस्थळावर यासंबंधीची माहिती देण्यात आली असून कंपनी 2300 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार होती. आयपीओ मागे घेण्याबाबतचे कारण मात्र कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. केरळातील या मुळच्या कंपनीची 68 हून अधिक शहरात शोरुम्स कार्यरत आहेत.









