गुहागर / प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग साठी गेलेले गुहागर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून (पुरवठा अधिकारी) प्रकाश खांडेकर यांचे हृदयविकाराच्या प्रकाश खांडेकर झटक्याने निधन झाले. त्यावेळी ते 56 वर्ष वयाचे होते.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मीटिंग सुरू असताना खुर्चीवर बसलेले प्रकाश खांडेकर अचानक बेशुद्ध होऊन पडले या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच धावपळ उडाली. गुहागर तहसील कार्यालयामध्ये अव्वल कारकून म्हणून ते काम करत होते त्यांच्यावर पुरवठा अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार होतात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये मीटिंगसाठी ते उपस्थित होते मीटिंग सुरू असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचारा अगोदरच त्यांचे निधन झाले होते ते मूळचे गुहागर तालुक्यातील मुंढर येथील आहेत.








