Insuli Shiv Jayanti celebrations include processions, rallies, historical dramas and double bari
ढोल ताश्यांच्या गजरात भव्य शोभायात्रा, पालखी, ऐतिहासिक नाटक, डबलबारी असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी व प्रत्येक घरासमोर झेंडा उभारून इन्सुलीत आगळीवेगळी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आली. दरवर्षी पेक्षा प्रचंड उत्साहात शिवजयंती उत्सव इन्सुली येथे साजरा करण्यात आला. डोबाशेळ मधून सुरू झालेली रॅलीची छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गावठण येथे सांगता करण्यात आली. यावेळी शाळकरी मुलांनी केलेले प्रबोधनात्मक कार्यक्रम वाखाणण्याजोगे होते.
दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव समिती व इन्सुली ग्रामस्थ यांच्यावतीने इन्सुली येथे शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. संत सोहिरोबनाथ मंदिर इन्सुली येथून शोभायात्रेची सुरुवात झाली बांदा उपसरपंच जावेद खतीब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅली चे उदघाटन करण्यात आले यावेळी उत्सव समिती प्रमुख नारायण राणे , सहाययक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, माजी सरपंच नाना पेडणेकर, कौस्तुभ गावडे, नितीन राऊळ, आपा आमडोसकर, दिलीप कोठावळे आदीसह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी ढोल ताश्यांच्या गजरात शोभा यात्रेची सुरुवात झाली त्यानंतर कोनवाडा, कुडवटेंम्ब, खामदेव नाका व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गावठण येथे सांगता करण्यात आली. यादरम्यान सावंतटेंम्ब, खामदेव नाका येथे शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
गावठण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यात शिवजन्म, पोवाडे, प्रबोधनात्मक भाषणे असे विविध कार्यक्रम शाळकरी मुलांनी सादर केले.यात इन्सुली गावातील प्राथमिक मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यावेळी इन्सुली गावातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्याचा सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शिवजयंती उत्सव समिती प्रमुख नारायण उर्फ बबन राणे व इन्सुली ग्रामस्थ यांनी केले.
सायंकाळी सावंतवाडी शहराचे माजी उपनगराध्यक्ष राजनजी पोकळे यांच्या हस्ते रंगमंचाचे उदघाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी माजी सभापती अशोक दळवी, गजानन नाटेकर , मंडळ अध्यक्ष दिलीप कोठावळे आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद गावकर यांनी केले. यानंतर नारायण उर्फ बबन राणे दिग्दर्शित आधी लगीन कोंढण्याचे हा नाट्य प्रयोग सादर करण्यात आला या नाट्यप्रविशिकेला प्रेक्षकांनि प्रतिसाद दिला. यानंतर बुवा व्यंकटेश नर विरुद्ध बुवा वैभव सावंत यांच्यात डबलवारी कार्यक्रम संपन्न झाला.
प्रतिनिधी
बांदा









