प्रतिनिधी/ पणजी
गोवा पर्यटन खात्यातर्फे राज्यात आयोजित केलेला कार्निव्हल काल शनिवारी 18 फेब्रूवारी रोजी पणजीत मोठ्या उत्साहात पार पडला. खा प्या मजा करा, आनंदी रहा, असा संदेश किंग मोमो यांनी दिला. हॅलीकॅप्टरमधून फुलांची बरसात केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिरवा झेडा दाखवून चित्ररथ मिरवणुकीला सुऊवात झाली. या वर्षी पहिल्यांदाच 17 फेब्रूवारी रोजी पर्वरीतून राज्यातील कार्निव्हलला सुऊवात झाली होती. काल पणजीत झाल्यानंतर आता मडगाव, वास्को आणि म्हापसा येथे कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक होणार आहे.
यावेळी मुखमंत्री प्रमोद सावंत यांच्या सोबत पर्यटन मंत्री रोहन खवटे, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात तसचे अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यातील पर्यटन व्यवसाय हा मुख्य व्यवसाय असून हा व्यवसाय वाढविण्यासाठी कार्निव्हल सारखे कार्यक्रम आयोजित करणे फार महत्त्वाचे आहे. अशा कार्यक्रमातून गोव्याची परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविले जाते तसेच कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध होत असते असे सांगताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झालेल्या कलकारांचे अभिनंदन केले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या.
जुने सचिवालय इमारतीपासून ते मिरामार पर्यंत कार्निव्हलच्या चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन केले होते. संपूर्ण गोव्यातून सुमारे 42 हून अधिक चित्ररथ सहभागी झाले होते. गोवा पोलिसांचाही चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिरवणुकीत आकर्षक ठरल्या त्या पर्यटन खात्याच्या डबलडेकर बस गाड्या. वाहक आणि चालकाने मिरवणूक पहाण्यासाठी उपस्थित असलेल्या लोकांना बसमध्ये चढण्याची अनुमती दिल्यावर लोकांनी बसमध्ये गर्दी करून मनसोक्त आनंद लुटला. गोव्यातील पारंपरिक व्यवसायांचे तसेच गोव्याच्या संस्कृतीचे दर्शविणारे चित्ररथ होते. मिठाचे आगर वाचवा, फइल बागायत, गोव्याचा पदेर, पावसाचा पुऊमेद, प्लास्टीक पासून दूर रहा, मद्य प्राशन करून वाहने चालवू नका असे संदेश देणारेही चित्ररथ मिरवणुकीत होते.
वेशभूषा स्पर्धेसाठी अनेक कलाकारांनी भाग घेतला होता. मिरवणूकदरम्यान अनेक कलाकारांनी नृत्याचा अविष्कार घडविला. स्थानिक तसेच देशी विदेशी पर्यटकांनी चित्ररथ मिरवणुकीचा मनोसोक्त आनंद लुटला.









