प्रतिनिधी/ वाळपई
सत्तरी तालुक्मयातील विविध गावातील मंदिरात महाशिवरात्री उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून श्रींच्या दर्शनाचा व अभिषेक लाभ घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीच्या आदल्यादिवशीही मोठ्या संख्येने मंदिरात भाविक उपस्थित होते.
मसोर्डे, वेळगे, ठाणे व झाडांनी या ठिकाणीही महाशिवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांनी मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन देव दर्शनाचा लाभ घेतला. मासोर्डे या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी पहायला मिळाली यावेळी अभिषेक व इतर स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत पार पाडले. देवस्थान समितीच्यावतीने अभिषेक करण्यासाठी चांगल्या प्रकारची व्यवस्था केली होती. या व्यवस्थेचा भाविकांनी लाभ घेतला.
ठाणे सत्तरी येथे महादेव मंदिरामध्ये भाविकांनी उपस्थित राहून देव दर्शनाचा लाभ घेतला. सकाळपासून ते रात्रीपर्यंत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पैकुळ गुळेली येथेसी महादेव मंदिरात उत्सव भक्तिभावाने साजरा झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला.









