प्रतिनिधी/ बेळगाव
निवडणुकांचे पडघम सुरू झाले असून बेळगावच्या कॅन्टोन्मेंट बोर्डची निवडणूक 30 एप्रिल रोजी होणार आहे. देशातील 57 छावणी परिषदेपैकी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड 15 व्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीबाबत अधिकृत आदेशपत्र संरक्षण मंत्रालयाने नुकतेच प्रसिद्धीस दिले आहे.
बेळगावच्या कॅन्टोन्मेंट बोर्डची स्थापना 1832 साली झाली. याची लोकसंख्या अंदाजे 15 हजारांहून अधिक आहे. अलीकडेच कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिका व्याप्तीत वर्ग करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. आता निवडणुकांमुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड पुन्हा चर्चेत आले आहे.









