नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आपण हिंदू असल्याचे भासवून एका हिंदू तरुणीची फसवणूक केल्यानंतर तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एक व्यक्ती आणि त्याचा मुलगा यांना अटक केली आहे. आरोपी युवकाचे नाव अखलाख शेख असून तो मुस्लीम धर्माचा आहे. युवती मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी आहे. अखलाख शेख याने त्याचे नाव अलोक शर्मा असल्याचे भासवले होते. फेसबुकचा उपयोग करुन त्याने या तरुणीला आपल्या जाळय़ात अडकवले होते. तिच्याशी त्याने शारिरीक संबंध ठेवले. नंतर तो विवाहित असून त्याचा धर्म मुस्लीम असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. त्याने तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याठी दबाव आणल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तिच्याशी केलेल्या शरीरसंबंधांची व्हिडीओ फिल्म बनवून त्याने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. नंतर या तरुणीनें आपल्या पालकांना आपली फसवणूक झाल्याची माहिती दिली. अखलाख शेख याच्या पित्यानेही या तरुणीशी शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. या विकृत पितापुत्रास आता अटक करण्यात आली असून त्यांच्यावर फसवणूक आणि बलात्काराचा आरोप दाखल करण्यात आला आहे.









