पणजी : येथील आझाद मैदानाच्या परिसरात गुऊवारी रात्री उशिरा स्मार्ट सिटीच्या खड्यात आणखीन एक ट्रक कलंडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कुणालाही जखम झाली नाही. स्मार्ट सिटीच्या खड्यात वाहने कलंडण्याची ही तिसरी घटना असून सरकार याबाबत गंभीर आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. काँक्रिटचे मोठे पाईप घेऊन जाणारा ट्रक स्मार्ट सिटीच्या ख•dयात कलंडला. हा प्रकार रात्री उशिरा झाल्यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला नाही. नंतर रात्री उशिरा तो ट्रक तेथून हटविण्यात आला. सुदैवाने चालकाला कुठलीही इजा पोहोचली नाही. मात्र, या अपघातामुळे पणजीतील रस्त्यांची वाईट अवस्था आणि खोदकामानंतर खचणारे रस्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
पणजी शहरातील रस्त्यावरील खोदकामानंतर रस्ते अचानक खचू लागल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामांच्या दजार्बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आझाद मैदान परिसरात काही दिवसांपूर्वी रस्ता खचला होता. त्यानंतर त्याची त्वरित डागडुजी करण्यात आली होती. पणजीत सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्ते फोडले आहेत. त्यामुळे अनेक भागातील रस्ते खचले आहेत. त्यामुळे अवजड वाहने या ख•dयामध्ये कलंडतात आणि अपघात घडतात. या पूर्वी सांतईनेज भागात अशाच प्रकारे ख•dयांमध्ये एक ट्रक व टेम्पो कलंडले होते. काहीजण जखमी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.









