वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या अर्जेंटिना खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या लोरेंझो मुसेटीने अर्जेंटिनाच्या पेद्रो कॅचिनचा पराभव करत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता मुसेटी आणि व्हेरीलास यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.
इटलीच्या मुसेटीने कॅचिनचा 6-2, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. पेरुच्या वेरिलासने थिएमचा 6-4, 6-4, पाचव्या मानांकित सेरुनडोलोने स्पेनच्या मुनेरचा 6-2, 6-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. मिरालेसने दियागो शुवार्जमनवर 6-1, 6-3 अशी मात केली.









