वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा संघ मार्च महिन्यात बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघामध्ये टी-20 आणि वनडे मालिका खेळवल्या जाणार आहेत. या दोन मालिकांसाठी इंग्लंडने आपल्या संघांची घोषणा केली आहे. दरम्यान या दौऱ्यासाठी इंग्लंडच्या निवड समितीने सॉमरसेटचा फलंदाज तसेच नवोदित चेहरा टॉम अॅबेलची निवड केली होती पण स्नायू दुखापतीमुळे अॅबेलला या दौऱ्याला मुकावे लागत आहे.
इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेट संघाचा कर्णधार टॉम अॅबेल याची बांगलादेश दौऱ्यासाठी निवड केली होती. दरम्यान लंका अ संघाविरुद्धच्या सामन्यात खेळताना त्याला स्नायू दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. अॅबेलचे आंतराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण पुन्हा लांबले आहे. बांगलादेश दौऱ्यासाठी आता जोस बटलरकडे वनडे आणि टी-20 संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
इंग्लंड वनडे संघ – बटलर (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, आर्चर, सॅम करन, शकीब मेहमूद, डेविड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, सॉल्ट, टॉप्ले, विन्से, ओक्स आणि वूड.
इंग्लंड टी-20 संघ- बटलर (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, आर्चर, सॅम करन, डकेट, जॅक्स, जॉर्डन, डेविड मलान, आदिल रशीद, सॉल्ट, टॉप्ले, ओक्स आणि वूड.
बांगलादेश-इंग्लंड पहिला वनडे सामना 1 मार्च, दुसरा वनडे सामना 3 मार्च, तिसरा वनडे सामना 6 मार्च, बांगलादेश-इंग्लंड पहिला टी-20 सामना 9 मार्च, दुसरा टी-20 सामना 12 मार्च, तिसरा टी-20 सामना 14 मार्च.









