मित्रासाठी लिहिले गेले होते पत्र
ब्रिटनमध्ये पहिल्या महायुद्धावेळी लिहिले गेलेले एक पत्र 105 वर्षांनी नमूद पत्त्यावर पोहोचले आहे. हे पत्र ज्या व्यक्तीने स्वीकारले आहे, त्याच्या आनंदाला आता पारावर राहिलेला नाही. हे पत्र 1916 मध्ये युनायटेड किंग्डमच बाथद्वारे पाठविण्यात आले होते. या पत्रावर राजे जॉर्ज पाचवे यांची मोहोर असलेला शिक्का आहे. हे पत्र 2021 मध्ये थिएटर दिग्दर्शक फिनले ग्लेन यांच्या लंडन येथील फ्लॅटच्या लेटरबॉक्समध्ये टाकण्यात आले होते.
ग्लेन आणि त्यांची प्रेयसी हे पत्र मिळाल्यावर चकित झाले होते. हे पत्र 100 वर्षांहून अधिक काळापर्यंत सुरक्षित कसे राहू शकते असा आम्हाला प्रश्न पडला होता असे ग्लेन यांनी म्हटले आहे. या पत्राब्दल माहिती मिळविण्याच्या उद्देशाने एक स्थानिक ऐतिहासिक सोसायटीत नेण्यापूर्वी ते सुमारे एक वर्षांपर्यंत ग्लेन यांच्या घरातच पडून होते.

संशोधनातून हे पत्र एका व्यक्तीने स्वतःच्या मैत्रिणीला लिहिले होते. पहिल्या महायुद्धादरम्यान केटी मार्शला त्यांची मैत्रिण क्रिस्टाबेल मेनेल यांनी हे पत्र पाठविले होते. ज्या बाथ येथे सुटी घालवत होत्या असे स्थानिक इतिहासपत्रिका द नोरवुड रिह्यूचे संपादक स्टीफन ऑक्सफोर्ड यांनी सांगितले आहे. केटी मार्श या स्थानिक स्टॅम्प मॅग्नेट ओसवाल्ड मार्श यांच्या पत्नी होत्या. तर क्रिस्टाबेल मेनेल हेन्री या एका धनाढय़ व्यापाऱयाची कन्या होत्या. पहिल्या महायुद्धादरम्यान हे पत्र पाठविण्यात आले होते. यादरम्यान राजे जॉर्ज पाचवे हे 5 वर्षांपर्यंत सिंहासनावर होते. तसेच एलिझाबेथ द्वितीय यांच जन्म होण्याच्या एका दशकापूर्वी हे पत्र लिहिले गेले होते.
पोस्ट विभागातील छाननीदरम्यान हे पत्र हरवले गेले असावे. हे पत्र संबंधिताच्या इतिहासाचा एक अद्भूत तुकडा आहे. याचमुळे त्यांच्या कुटुंबातील नव्या पिढीचा सदस्य हे पत्र मिळवू शकतो असे ऑक्सफोर्ड यांनी सांगितले आहे. या पत्रात लिहिण्यात आलेला मजकूर हा तत्कालीन वातावरण, स्थानिक इतिहास आणि नॉरवुडमध्ये राहणाऱया लोकांबद्दल रोमांचक माहिती प्रदान करणारा आहे.









