रात्रीच्या वेळेस किल्ले राजगडावर राहण्यास बंदी केल्यानंतर गडप्रेमी आणि शिवप्रेमीकडून राज्य पुरातत्व विभागाचा जाहीर निषेध केला जात आहे. त्यात आज शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या वतीने राज्य पुरातत्व विभागाच्या संचालकांनाच थेट आव्हान दिले आहे. राजगड किल्ला सूर्योदय पासून ते सूर्यास्तपर्यंत आमच्या सोबत अभ्यासपूर्ण पाहून आपण येणार असाल तर आपणास शिवप्रेमी कडून एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे निवेदनच आज देत थेट आव्हान दिलं आहे. किल्ले राजगडावरील निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे यांची शिवदुर्ग संवर्धन आंदोलन समितीच्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी भेट घेतली. किल्ले राजगड विषयी पुरातत्व खात्याने काढलेल्या रात्रीच्या मुक्काम बंदी विरोधात यावेळी चर्चा केली. राजगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक येथे पर्यटकांना तसेच कोणत्याही व्यक्तीस रात्रीचा मुक्काम करण्यास बंदी करण्यात आल्या बाबत आदेश निर्गमित केला आहे. त्याला गडप्रेमी आणि शिवप्रेमी कडून विरोध होत आहे. मे महिन्यातील आपण सांगाल त्या तारखेस एक दिवसीय राजगड किल्ला अभ्यास दौरा स्वतः आपण आम्हा शिवप्रेमीं सोबत करावा. आपण दिलेल्या मुदतीत गडपायथ्या पासून सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत पूर्ण राजगड अभ्यासपूर्ण पाहून परत गड पायथ्याशी यावे. असे आपण केल्यास आम्हा शिवप्रेमी,गडप्रेमी कडून आपणास एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करत आहोत.असेही शिवदुर्ग संवर्धना आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
आपण राजगड दौरा पूर्ण यशस्वी केल्यास आम्ही आपला आदेश मान्य करू परंतु जर आपण नियोजित दौरा पूर्ण करण्यास असमर्थ राहिलात तर आपण काढलेला राजगड किल्ल्यावर रात्रीच्या वेळी मुक्काम करू न देण्याचा आदेश मागे घेऊन शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी.असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अमित आडसुळे, हर्षल सुर्वे, राम यादव, रविराज कदम, प्रज्वल गोडसे हे उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








