मंत्री निलेश काब्राल यांचे उद्गार : ढवळी येथे जोडणी प्रक्रियेचा शुभारंभ
वार्ताहर / मडकई
नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनासाठी प्रत्येक घर व व्यावसायिक आस्थापनाला मल्लनिस्सारण जोडणी सक्तीची केली जाणार आहे. रहिवाशांसाठी प्रत्येक घरामागे पाच हजार ऊपये शुल्क निर्धारीत केले असून ज्यांना शक्य नाही त्यांनी नळाच्या बिलावर दरमाही दीडशे ऊपये अतिरिक्त आकारले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांनी दिली. कवळे पंचायत क्षेत्रासाठी ढवळी येथील येथे इंदिराबाई भट ढवळीकर हायस्कूलच्या सभागृहात मलनिस्सारण जोडणी कार्यक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, शांतादुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कुमार सरज्योतीषी, जयंत मिरींगकर, कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, कवळे पंचायतीच्या सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर, पंचसदस्य प्रिया दहीफोडे, सोनाली तेंडुलकर, माजी सरपंच राजेश कवळेकर, मलनिस्सारण महामंडळाचे संचालक अमर वझरानी, कार्यकारी अभियंते प्रदीप गावडे, सत्वशिला नाईक, सुमित्रा नाईक, योगेश कवळेकर, सर्वेश आमोणकर, विठोबा गावडे आदी उपस्थित होते.
मलनिस्सारणच्या प्रकल्पासाठी रस्त्यांचे खोदकाम करावे लागले. अनेक ठिकाणी ख•s पडलेले आहेत. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हॉटमिक्स डांबरीकरण होणार असल्याचे मंत्री काब्राल यांनी सांगितले.
अडचणीवर मात करून मलनिस्सारण प्रकल्प साकार – मंत्री सुदिन ढवळीकर
ग्रामीण भागातून साकार करण्यात आलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाचा लाभ बांदोडा, कवळे, दुर्भाट, कुर्टी आदी पंचायत क्षेत्रांना होणार आहे. मडकई मतदारसंघात हा प्रकल्प राबविला गेल्याने नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धन होणार आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या सर्वांच्या सहकार्याने हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. ज्या ज्या भागात हा प्रकल्प राबविण्यात आलेला त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना आपण श्रेय देतो. या प्रकल्पासाठी जनता आपल्या सोबत राहिली. काही राजकारण्यांनी विरोध केला. त्यासाठी न्यायालयातही जावे लागले. या सर्वांवर मात करून मलनिस्सारण प्रकल्प साकार होत आहे. प्रत्यक्ष जोडणी प्रक्रिया सुऊ झाली असून अर्जांसाठी नागरिकांना अडचण असल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा. ढवळी भागात एकूण पाच हजार घरांना जोडणी देण्याचे काम सुरु होईल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
पुरोहित सुब्राय भट यांच्या अधिपत्याखाली धार्मिक विधी व त्यानंतर मंत्री काब्राल व मंत्री ढवळीकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत कुमार सरज्योतिषी यांनी केले. सूत्रसंचालन तानाजी गावडे यांनी तर प्रदीप गावडे यांनी आभार मानले.








