प्रतिनिधी / धारबांदोडा
सोनावळी-कुळे येथील श्री कालनाथ सातेरी दुधसागर देवतांचा वर्धापनदिन सोहळा बुधवार 22 फेब्रु.रोजी विविध कार्यक्रमानिशी साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त सकाळी अभिषेक, धार्मिक विधी, महापूजा, स्थळ सिद्धी, पुर्णाहुती, बलिदान व महाआरती, ब्राह्मण आर्शिवाद होणार असून दुपारी 1 ते 4 पर्यंत महाप्रसाद, त्यानंतर सायंकाळी 5 वा. भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ 10 वा. आर्केस्ट्रा ‘सारेगमप कोल्हापूर’ व ‘पैशापोटी ही माया खोटी’ ही नाटीका सादर होणार आहे. दरम्यान दुधसागर देवस्थान एक अंत्यत जागृत देवस्थान म्हणून मानले जात आहे. या देवतांच्या वर्धापनदिनाला गोव्यातील कानाकोपऱ्यातून व शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गोव्यात दाखल होत असताता.
दुधसागर उत्सवाच्या सुरळी वाहतूकीसाठी आमदारांनी घेतली बैठक
दरवर्षी येथे होणाऱ्या भाविकांना पार्किंग व अनियंत्रित वाहतूकीचा बराच त्रास सहन करावा लागत असतो. त्यातच दुधसागर पर्यटन हंगामाच्या जीपगाड्याची वाहतूक सुरू असते, त्यामुळे पर्यटकांचीही मोठी कुंचबणा होत असते. यावर नियंत्रण येणे महत्वाचे आहे. या अनियंत्रित वाहतूकीवर नियंत्रण आणण्यासाठी यंदा आमदार गणेश गावकर यांच्या उपस्थितीत मोले वन विभाग, कुळे पोलीस, दुधसागर टुर ऑपरेटर संघटना यांची संयुक्त बैठक धारबांदोडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली आहे, त्यामुळे यंदा अनियत्रित वाहतूक व पार्किग व्यवस्था सुरळीत होईल अशी अपेक्षा भाविक व ग्रामस्थांनी व्यक्त केली जात आहे.









