श्रद्धा वालकर हत्याकांडाच प्रकरण ताज असतानाच पुन्हा एकदा अशाच हत्याची पुनरावृत्ती झाली आहे. दिल्लीत एका 22 वर्षीय मुलीची हत्या करून प्रियकराने मृतदेह फ्रिजमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीमधील बाबा हरिदास नगर परिसरातील ही घटना आहे.सध्या सोशल मीडियावर या दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत. साहिल गेहलोत असे मुलाचे नाव आहे. साहिलला पोलीसांनी मित्रौ गावातून ताब्यात घेतले आहे.हत्येच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० फेब्रुवारी रोजी झज्जरमधील मंदोठी गावात दुसऱ्या मुलीशी त्याने लग्न केले.
मिळालेल्या माहितीनुसार,
साहिल गेहलोत आणि तिची प्रियसी निक्की यादव हे दोघे दोन वर्षापासून लव्ह इऩ- रिलेशनशीपमध्ये राहत होते. मात्र घरच्यांच्या दबावामुळे त्याने दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा केला. ही गोष्ट जेव्हा निक्कीला कळाली तेव्हा तीने त्याला फोन करायला सुरुवात केली.यानंतर लग्नाच्या एक दिवस आधीच्या रात्री एक वाजता दोघे भेटले.दोघांनी गोव्याला पळून जायचे होते.निक्कीचे गोव्याचे विमानाचे तिकीट झाले,पण साहिलला तिकीट मिळाले नाही.दरम्यान, नातेवाईकांनी साहिलवर तातडीने घरी येण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.साहिल घरी जाऊ लागला तेव्हा निक्की त्याच्याशी भांडू लागली.निक्कीने साहिलला एकत्र आत्महत्या करायचे सूचवले. पण, साहिल त्यासाठी तयार नव्हता.
भांडण खूप वाढत गेल्याने साहिलने पहाटे ४ वाजताच्या सुमारास ISBT येथे कारमधील डेटा केबलने निकीचा गळा आवळून खून केला.यानंतर आरोपी साहिलने निकीचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि 40 किमी दूर असलेल्या मित्राळ या गावी नेला. वाटेत त्याची कुठेही तपासणी झाली नाही. साहिलने लग्नानंतर निकीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली होती.त्याने तीचा मृतदेह त्याच्यात ढाब्यावर असलेल्या फ्रिजमध्ये ठेवला. त्यानंतर तो घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी त्याने दुसऱ्या दिवशी लग्न केले.मात्र एका अज्ञाताने याची माहिती पोलीसांना दिली. त्यानुसार पोलीसांनी साहिलला ताब्यात घेतले. पुढील तपास गुन्हे शाखेचे विशेष पोलिस आयुक्त करत आहेत.साहिल चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबातील आहे. त्याची आई सरकारी शिक्षिका आहे. तर निकीच्या वडिलांचे गुरुग्राममध्ये मोठे गॅरेज आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









