Sanjay Raut : फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य आहे. वैफल्यातून फ़णवीसांनी वक्तव्य केल्याची टिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. विधान परिषदेच्या पराभवातून फडणवीसांना वैफल्य आले आहे. आमच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी फडणवीसांनी खोटी वक्तव्य केली. असा कोणता गुन्हा केलाय की फडणवीसांचं मन त्यांना खातयं, असा सवाल संजय राऊत य़ांनी माध्यमांशी बोलताना केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून केलेल्या वक्तव्यावरून राऊतांनी आज निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस अजूनही पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडले नाहीत.सत्तेच वाटप 50 टक्के हा त्यांचा शब्द आहे. याचा व्हिडिओ त्यांनी स्वत: तपासून पहावा. उद्या ते म्हणतील सुरत, गुवाहाटी, मुंबईत 40 आमदारांचा जो शपथविधी झाला तो ही शरद पवारांच्या सांगण्यावरून झाला असेही सांगू शकतात.आमचे फोन टॅपिंग करण्यात आले याची चौकशी त्यांनी थांबवली असा आरोप राऊत यांनी केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








