वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंड संघाला आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून देणारा कर्णधार इऑन मॉर्गनने फ्रांचायजी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. आता तो क्रिकेटच्या विविध प्रकारात तसेच फ्रांचायजी क्रिकेटसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही.
36 वर्षीय मॉर्गनने 2022 च्या जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला होता. आपल्या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने इंग्लंडला आयसीसीच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले. इंग्लंडने आतापर्यंत केवळ एकदाच विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. 2006 साली. मॉर्गनने वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून पर्दापण केले होते. डावखुरा फलंदाज मॉर्गनने 248 वनडे सामन्यात 7701 धावा जमविल्या असून तसेच 115 टी-20 सामन्यात 2458 धावा नोंदविल्या आहेत. 2010 ते 2012 या कालावधीत त्याने 16 कसोटीत 700 धावा जमविल्या आहेत. मॉर्गच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने आयसीसीचे टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धाही जिंकली होती.









