मुंबई
ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने हल्लीच व्यावसायिक सेडन प्रकारात ‘टूर एस’ फेसलिफ्ट कार सादर केली आहे. नव्या स्विफ्ट डिझायर या गाडीवर आधारित नवे मॉडेल कंपनीकडून दाखल करण्यात आले आहे. सदरची टूर ही नवी गाडी पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर चालणारी असणार आहे. पेट्रोल व्हेरियंट कारची किंमत 6.51 लाख रुपये असून सीएनजी व्हेरियंटची किंमत थोडी जास्त म्हणजेच 7.36 लाख रुपये असणार आहे. पेट्रोलवर आधारित कार प्रति लिटरमागे 23 किलोमीटरचे मायलेज देऊ शकणार असून सीएनजीव्ची कार 32 किलोमीटरचे मायलेज देते.









