Kolhapur News : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे ट्रक चालवून पाच ते सहा दुचाकींना धडक देणाऱ्या ट्रकचालकास नागरीकांनी पाठलाग करुन बेदम चोप दिला.तसेच ट्रकचीही तोडफोड केली.नागरिकांच्या मारहाणीमध्ये ट्रकचालक शीतल काशिनाथ शिपुगडे (वय 32 रा. बापट कँम्प) हा जखमी झाला आहे.रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर ही घटना घडली. रात्री उशिरा पर्यंत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
याबाबत अधिक माहिती अशी की,ट्रकचालक शीतल शिपुगडे हा राजापुर येथून चिरा भरुन कोल्हापूरकडे येत होता.रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्याने कळे येथील एका धाब्यावर थांबून मद्यप्राशन केले व जेवण केले.यानंतर मद्यधुंद अवस्थेतच तो ट्रक घेवून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाला.काही अंतर आला असता त्याने रस्त्याकडेला थांबलेल्या काही दुचाकींना धडक दिली.यानंतर ट्रक न थांबवता तो तसाच कोल्हापूरच्या दिशेने वेगाने पसार झाला.यामध्ये दोन दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान फुलेवाडी नजीक हा ट्रक आला असता तेथेही त्याने काही दुचाकींना धडक दिली.
दरम्यान कळे येथील काही दुचाकीस्वार त्याचा पाठलाग करत फुलेवाडीपर्यंत आले.त्यांनी शितलला वाटेतच अडवून थांबविले.ट्रकमधून उतरल्यानंतर शितल मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले.यानंतर तेथे जमलेल्या नागरीकांनी शितलला मारहाण करत ट्रकची तोडफोड केली.दरम्यान या घटनेची माहिती करवीर पोलिसांना मिळाली.त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून शितलला ताब्यात घेतले. दरम्यान या घटनेमुळे वाहनचालकांच्यात घबराटीचे वातावरण पसरले होते. हा थरार प्रत्यक्ष पाहणाऱ्यांना किंवा अनुभवणारे मरणाच्या दारातून परत आल्याचे सांगत होते.
ट्रकची टायर फुटली
मध्यधुंद अवस्थेत असलेल्या शितलला ट्रकची टायर फुटल्याचेही भान नव्हते. ट्रकची एका बाजूची टायर पुर्णपणे फुटली होती. केवळ व्हिलवर ट्रक काही अंतर चालून आला होता.
केवळ दैव बलवत्तर म्हणून
शितलने कोल्हापूर – गगनबावडा मार्गावर काही थांबलेल्या वाहनांना तर काही रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. मात्र ही धडक वाहनचालकांनी चुकविल्याने कोणतीही जिवीत हानी अथवा कोणास दुखापत झाली नाही. शितल अत्यंत वेगाने ट्रक चालवत होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांच्या जिवाचा थरकाप उडाल्याचे काही जणांनी यावेळी सांगितले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









