नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीच्या डिस्कॉममधून दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी आम आदमी पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींची हकालपट्टी केली आहे. यावर या पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप केला आहे. मात्र, उपराज्यपालांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींनी डिस्कॉम मंडळातील खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संधान बांधून खासगी कंपन्यांचा 8 हजार कोटी रुपयांचा फायदा करुन दिला. खासगी कंपन्यांचा हा लाभ जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार करुन करण्यात आला असा आरोप केंद्र सरकारने केला असून त्याची चौकशीही करण्यात येत आहे.









