साके येथे सभासदांना 13.70 लाखाचा बोनस वाटप
व्हनाळी प्रतिनिधी
अन्नपुर्णा पाणी पुरवठा योजना होण्यापुर्वी इथला शेतकरी उदरनिर्वाहसाठी राज्यभर वनवन भटकत होता.ज्या ठिकाणी तण उगवायचं धाडस करत नव्हतं अशा ठिकाणी आज हिरविगार पिके ऐन उन्हाळ्यातही डोंगरात डुलत आहेत हे केवळ माजी आमदार संजयबाबा घाटगेंमुळेच शक्य झाले आहे. हे पाहता अन्नपुर्णा ने येथील शेतक-यांची शास्वत प्रगती केली असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी केले.
साके ता.कागल येथे यात्रेनिमित्त अन्नपुर्णा पाणी संस्थेमार्फत सभासदांना बोनस वाटप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक ज्ञानदेव पाटील होते.यावेळी पंचक्रोशीतील 3 हजार 900 सभासदांना यात्रेनिमित्त 13 लाख 70 हजार 423 रूपये बोनस रक्कमेचे वाटप गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे,संचालक ज्ञानदेव पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य नानासो कांबळे, अशोक पाटील,संजय सुतार ,मुख्य सचिव आकाराम बचाटे यांचे हस्ते करण्यात आले.
घाटगे पुढे म्हणाले, अन्नपुर्णाच्या पांढ-या पट्ट्यात आज जी प्रत्येक गावांची प्रगती झाली त्यामध्ये रस्ते,इमारती,वहाने याची सुबत्ता आली. परंतु केवळ या भौतिक सुखावर आपण न थांबता या परिसरातून उच्चशिक्षित होवून इथल्या तरूणांनी क्लासवन अधिकारी बनाव अशी आपली अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.मॅनेंजर रघुनाथ पाटील,बाजीराव चौगले,युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमास सुजय घराळ,तानाजी चौगले, बापूसो हरेल,श्रीपती चौगले,तुकाराम पाटील,सदाशिव गवसे, डॅा.प्रविण कांबळे,राजू चौगले ,धनाजी शेंडे शेतकरी सभासद व कर्मचारी उपस्थित होते.स्वागत मोहन गिरी यांनी केले आभार सागर लोहार यांनी मानले.









