नगरसेविका सौ. तन्वी चांदोसकर यांची मागणी
देवगड तालुक्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. तालुक्यात अनेक गुणवंत करताकार असून ते नाट्य क्षेत्रात व सिनेसृष्टीत आपले करिअर घडवित आहेत. देवगडमध्ये नवीन कलाकार निर्माण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दिवगड-जामसंडे शहरात महाराष्ट्र शासनामार्फत सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात यावे अशी मागणी भाजपा नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर यांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली आहे। देवगडमध्ये नाट्यगृह झाल्यास नागरिकांना व्यावसायिक व प्रायोगिक तत्वावरील नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. स्थानिक कलासाठी आपली कला जगासमोर आणता येईल यासाठी देवगडमध्ये लवकरात लवकर नाट्यगृह मंजूर व्हावे, अशी मारणी केली आहे.
प्रतिनिधी/ देवगड









